News Flash

करोना संशयितांची आता प्रतिजन चाचणी

अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींची प्रतिजन चाचणी (रॅपिड अँटीजन) करण्याचा मार्ग मोकळा

प्रतिकात्मक छायाचित्र

करोना संशयितांची चाचणी करता यावी यासाठी मुंबई महापालिकेने सामाईक चाचणी धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे संशयित, तसेच लक्षणे नसलेल्या मात्र अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींची प्रतिजन चाचणी (रॅपिड अँटीजन) करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने परवानगी दिल्यानंतर मुंबई महापालिकेने एक लाख प्रतिजन चाचणीच्या संचाची खरेदी केली आहे. दरम्यान मुंबईमधील करोना संशयित आणि लक्षणे नसलेल्या परंतु अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींची चाचणी करता यावी म्हणून पालिकेने सामाईक धोरणाचा स्वीकार केला आहे. ही चाचणी सध्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालये व प्रतिबंधात्मक क्षेत्रांत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोरेगाव (पी-दक्षिण), मालाड (पी-उत्तर), कांदिवली (आर-दक्षिण), दहिसर (आर-उत्तर) व बोरिवली (आर-मध्य) या परिसरातील करोना संशयित, लक्षणे नसलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींवर ही चाचणी करण्यात येणार आहे. लक्षणे असलेल्या करोना संशयिताच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास दुसऱ्यांदा नमुना घेऊन ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:09 am

Web Title: now antigen testing of corona suspects abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
2 मुंबईत मुसळधार; पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला
3 मुंबई हादरली! वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं बोलवून महिलेवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X