News Flash

शाळा, महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीत आता पोलीसही

परळच्या दामोदर सभागृहात मुंबईतील मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील शाळांनी आपला परिसर विद्यार्थ्यांकरिता सुरक्षित कसा राहील यासाठी एकत्र येऊन विचारविनिमयास सुरूवात केली आहे. शाळांच्या या प्रयत्नांना पोलिसांनीही मदतीचा हात देऊ केला असून आता शाळा, महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीत पोलिसांनाही सामावून घेतले जाणार आहे.

परळच्या दामोदर सभागृहात मुंबईतील मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी शाळां-महाविद्यालयांमध्ये अनुचित प्रकार घडू नयेत आणि विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी नेमण्यात येणाऱ्या सुरक्षा समितीत स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारीही असतील आणि त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राहील, असे आश्वासन मुख्याध्यापकांना दिले. ‘सेफ स्कूल, सेफ स्टुम्डंट्स’ या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेश आदी सहभागी झाले होते.

डॉ. दिघावकर यांनी प्रत्येक शाळेत एक पोलीस शिपाई तर महाविद्यालयात एक पोलिस अधिकारी देण्याची व्यवस्था आम्ही करू. तसेच, शालेय सुरक्षा समितीतही आम्ही महिला पोलिस अधिकारी पाठवू, असे आश्वासन दिले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी यावेळी मुख्याध्यापकांच्या शंकांना उत्तरे दिली. ‘मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या मनोविश्वाशी एकरूप होऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. शिवाय पालकांना बरोबर घेऊन मुलांच्या जडणघडणीतले प्रश्न सोडविले पाहिजे. प्रत्येक शाळेत मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशक असावा.

शाळेमध्ये पालक-शिक्षक संघासारख्या शाळा सुरक्षा समित्याही नेमल्या पाहिजे,’ अशी सूचना डॉ. देशपांडे यांनी केली.

शाळांमध्ये सीसी टीव्ही

शाळांमध्ये सीसी टीव्ही लावण्याकरिता राज्य सरकारने मदत करावी, अशी सूचना यावेळी मुख्याध्यापकांनी केली. तसेच, सफाई कर्मचारी, बसमधील सहाय्यक महिला असाव्या, अशी सूचनाही यावेळी करण्यात याव. तसेच, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालका यांच्याकरिता कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टीने जाणीवजागृती करण्यात शाळांनी पुढाकार घ्यावा, असा ठराव यावेळी करण्यात आला. हे अभियान राबविण्याकरिता प्रा. संगीता श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मुख्याध्यापकांची समिती नेमण्यात आल्याची घोषणा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:26 am

Web Title: now police will include in security committee of schools colleges
Next Stories
1 उत्सव ढोल-ताशांचा..
2 मुंबई पालिकेची फलकबाजी सुरुच!
3 पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत कपात होणार!
Just Now!
X