टाळेबंदीत कुलुपबंद असलेली सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आता खुली करावीत, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही मंदिर प्रवेशासाठी रस्यावर उतरणार आहेत. ८ सप्टेंबर पर्यंत  प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिला आहे.राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करावीत, या मागणीसाठी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर लगेचच आठवले यांच्या वतीनेही याच मागणीसाठी आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले.