पालिका आणि राज्य सरकार यांच्या जमीन मालकीविषयी असलेला संभ्रम दूर झाल्यामुळे महालक्ष्मी येथे थीम पार्क करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवरील मालकी हक्क राज्य सरकारने सोडल्याने तिथे पालिकेकडून  जागतिक दर्जाचे थीम पार्क करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे महापौर सुनील प्रभू यांनी मंगळवारी सांगितले.
महालक्ष्मी रेसकोर्समधील भूभाग पालिकेने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर दिला होता. हा भाडेकरार २०१३ मध्ये पूर्ण झाल्यावर तेथे थीम पार्क उभारण्याची योजना पालिकेने मांडली. मात्र या पार्कची जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने त्यांची परवानगी आवश्यक असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत पालिकेकडून राज्य सरकारशी चर्चा सुरू होती. दरम्यान, थीम पार्क उभारण्याची तयारी टर्फ क्लबने दाखवली होती. मात्र पालिकेने भाडेकरार वाढवला नाही.
पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यासाठी १८८२ मध्ये ही जागा पालिकेकडे देण्यात आली. १९४४ मध्ये ही जागा टर्फ क्लबला भाडय़ाने देण्यात आली. त्यानंतर १९७४ मध्ये वीस वर्षांसाठी व त्यानंतर २०११ पर्यंत कराराची मुदत वाढवण्यात आली. १९९१ मध्ये राज्य सरकारने या जागेवरील हक्क सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे, असे महापौर सुनील प्रभू म्हणाले. या जागेवर थीम पार्क तयार करण्याच्या प्रस्ताव पालिका सभागृहातही मान्य झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मुंबई महानगरपालिकेच्याच ताब्यात असल्याने तेथे थीम पार्क उभारण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे, असे महापौर म्हणाले.
महालक्ष्मी रेसकोर्समधील भूभाग पालिकेने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर दिला होता. भाडेकरार २०१३ मध्ये पूर्ण झाल्यावर तेथे थीम पार्क उभारण्याची योजना पालिकेने मांडली. मात्र या पार्कची जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने त्यांची परवानगी आवश्यक आहे