02 July 2020

News Flash

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ११६, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

सांगलीत ५ तर मुंबईत ४ नवे रुग्ण आढळल्याने वाढली संख्या

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर गेली आहे.  आज सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर चार व्यक्ती अशा आहेत ज्या मुंबईतल्या आहेत. त्यांना प्रवासाचा इतिहास किंवा संसर्ग असे कारण आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 2:08 pm

Web Title: now total 116 corona patients in maharashtra says health minister rajesh tope scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 आपल्या वर्तमान काळावरच भविष्य अवलंबून : मुख्यमंत्री
2 सकाळी आलो असतो, तर छातीत धस्स झालं असतं – उद्धव ठाकरे
3 करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे
Just Now!
X