आपल्या घराच्या आसपास धार्मिक उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण होत असेल तर नेमकी तक्रार कुठे करायची हे नागरिकांना कळत नाही. मुंबई पोलिसांनी अशा तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रणक कक्ष, संकेतस्थळ, ट्विटर याचबरोबर लघुसंदेशाचे माध्यमही उपलब्ध करुन दिले आहे.

धार्मिक उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग झाल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, याची विचारणा उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकदरम्यान केली होती. त्याच्या उत्तरादाखल, मुंबई पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्ष, पोलिसांचे संकेतस्थळ याचबरोबरीने ट्विटर हँडल आणि लघुसंदेश करण्याचे दोन क्रमांकही उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले होते.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

पुढील प्रकारे तक्रार करा

  • १०० क्रमांकावर फोन अथवा भ्रमणध्वनीमार्फत संपर्क साधा.
  • mumbaipolice. maharashtra.gov.in वर तक्रार नोंदवा.
  • पोलिसांचे ट्विटर हँडल @mumbaipolice येथे ट्विट करा.
  • ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ या क्रमांकावर लघुसंदेश पाठवा.