05 June 2020

News Flash

Coronavirus : ब्रीचकॅण्डीतील परिचारिका वसतीगृह बंद

एका परिचारिकेला लागण झाल्याने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

(संग्रहित छायाचित्र)

एका परिचारिकेला लागण झाल्याने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

मुंबई : ब्रीचकॅण्डी रुग्णालयात एका परिचारिकेला करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहीम येथील परिचारिकांचे वसतिगृह बुधवारी प्रतिबंधित केले आहे.

करोनाची बाधा झालेल्या सैफी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञाने शस्त्रक्रिया केलेल्या दिवशी कामावर असलेला तंत्रज्ञाला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर रुग्णालयातील हृदयरोग विभाग २७ मार्चला बंद करून आपात्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील एका परिचारिकेलाही लक्षणे आढळून आल्याने तिची तपासणी केली होती. मंगळवारी तिची चाचणी सकारात्मक आल्यानंतर तिला रात्रीच रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. परिचारिका माहीम येथील रुग्णालयाच्या वसतिगृहात राहत असल्याने हे वसतिगृह प्रतिबंधित केले आहे. यात १७६ परिचारिका असून यांची चाचणी बुधवारी करण्यात येणार असून यातील सकारात्मक चाचणी आलेल्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल, असे वार्ड अधिकारी किरण दिघावकर यांनी माहिती दिली.परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या अजून ९० कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू आहेत.

जसलोक रुग्णालयातील करोनाबाधित २१ परिचारिकांपैकी १६ जणांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. एका रुग्णाला कस्तुरबामध्ये मंगळवारी पाठविले आहे, तर ४ जणांवर जसलोकमध्येच उपचार सुरू आहेत.

१५ परिचारिकांचे अलगीकरण

वांद्रे येथील भाभा रुग्णालयात ४ मार्चला दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारी त्याचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णालयातच एकच गोंधळ उडाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ परिचारिकांना अलग राहण्याच्या सूचना दिल्या असून चाचण्या के ल्या आहेत. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन आंदोलन के ले. रुग्णालयातून सुरक्षा साधने देण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी के ली. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांना या सुविधा देण्याची आवश्यकता नाही आणि मर्यादित सुरक्षा साधने उपलब्ध असल्याने याचा वापर योग्यरितीने करणे गरजेचे आहे., असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 3:03 am

Web Title: nurse tests positive at breach candy hospital zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 coronavirus lockdown : टाळेबंदीत नोकरदार महिलांची फरफट
2 Coronavirus : करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांमुळे दोन वसाहती बंद
3 coronavirus  : १४ हजार करोना संशयितांच्या तपासण्या
Just Now!
X