|| नमिता धुरी

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

संतुलित आहार आणि घरच्या घरी व्यायामावर भर देण्याची आहारतज्ज्ञांची सूचना

मुंबई : कसा तरी एकदाचा ३१ मार्चचा दिवस जाईल आणि नियमित दिनचर्या सुरू होईल, अशी आशा नोकरदार वर्गाला होती. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करताना शरीराची हालचाल होते, व्यायामशाळेत व्यायाम के ला जातो, खाणे-पिणे व्यवस्थित असते. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहाते. मात्र आता १४ एप्रिलपर्यंत घरातच बसावे लागणार असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि सोप्या व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

खाणे-पिणे या गोष्टींचा वापर बऱ्याचदा विरंगुळा म्हणूनही के ला जातो. त्यामुळे दूरचित्रवाणी पाहता पाहता चिप्स किं वा मॅगी, पास्ता खाण्याची सवय असते. लहान मुले सध्या घरात असल्याने पालक मुलांच्या आवडीचे गोडधोड पदार्थ करतात. या २१ दिवसांतही सुदृढ राहायचे असले तर नेहमीच्या सवयी सोडायला हव्यात, असे तज्ज्ञांचे मत आहे. क्रीडा आहारतज्ज्ञ आणि मास्टर ट्रेनर प्रणीत शिळीमकर सध्या ७० सेलेब्रिटींना आहारासाठी मार्गदर्शन करत आहेत. तेच आहार नियोजन त्यांनी सामान्य नागरिकांसाठी सुचवले आहेत. ‘सकाळी नाश्त्याला ग्रीन टी िंकं वा ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. सोबत दोन अंडी, सॅलड खावे. पोहे, उपमा, शिरा असा नाश्ता के ल्यास तात्पुरती ऊर्जा मिळते. त्याऐवजी पनीर भुर्जी, ओट्स, धान्यांपासून तयार झालेला पाव याचा समावेश नाश्त्यामध्ये असावा,’ असे प्रणीत सांगतात. दुपारच्या जेवणात पालेभाजी, ज्वारी-बाजरीची भाकरी, दही, काकडी खावे. जेवणासाठी बटर किं वा ऑलिव्ह तेलाचा वापर करावा, असा सल्ला प्रणीत देतात. नाश्त्याला िंकं वा दुपारच्या जेवणाला खाल्लेले पदार्थ रात्रीच्या  जेवणालाही खाता येतील. रोगप्रतिकारशक्ती कमकु वत करणारे साखरेचे व साखरयुक्त कोला, आइस्क्रीम यांसारखे पदार्थ टाळण्याचा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य अश्विन सावंत देतात. वसंत ऋतूमध्ये सहज पचणारा आहार अपेक्षित असल्याने पावटे, छोले, सोयाबीन अशा मोठय़ा आकाराच्या डाळी खाऊ नयेत. याउलट मूग, मटकी, मसूर, कु ळीथ यांसारखी कडधान्ये खावीत. ती पचायला हलकी असतात. उपलब्ध धान्यांपासून सहज बनवण्यासारखा पदार्थ म्हणजे मुगाची खिचडी. तृणधान्य व कडधान्य यांचे आहार विज्ञानाला अपेक्षित असलेले एकास चार प्रमाण तंतोतंत पुरवणारा हा साधा पारंपरिक पदार्थ शरीराला आवश्यक ते सर्व पोषण योग्य प्रमाणात देतो. त्यावर लोणकढी तूप मिसळले तर आवश्यक चरबीची पूर्तता होईल, असे अश्विन सावंत सुचवतात. कफ प्रतिबंधक म्हणून जिरे, हळद, कडीपत्ता असे कडू पदार्थ खाण्याचा सल्ला ते देतात.

व्यायाम काय करावा?

शरीराचा जास्तीत जास्त वापर होईल असा व्यायाम करावा. भिंतीच्या आधाराने पुश-अप्स करता येतील. तांदळाचा डबा उचलून स्कॉट्स करता येतील. तसेच जड वस्तू भरलेली बॅग, भरलेली पाण्याची बाटली अशा वस्तूंच्या साहाय्याने घरच्या घरी व्यायाम करून शरीर सुदृढ राखता येईल, असे प्रणीत शिळीमकर सांगतात. जड बॅग खांद्याला लावून जमिनीवर ठेवलेली वस्तू उचलावी, ताठ उभे राहून, वाकू न पुन्हा वस्तू ठेवावी.

काही टिप्स

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराला क जीवनसत्त्वाची गरज असते. ते आवळा, संत्रे, लिंबू, शेवग्याची पाने, माठ इत्यादींतून मिळते.
  •  उन्हाळ्याचे दिवस असल्याने भरपूर प्रमाणात घाम येतो. त्यातून क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे मीठ घातलेले लिंबू सरबत प्यावे. मिठातून शरीराला क्षार मिळतात.
  •  दुपारनंतर सुकामेवा खावा.
  •  पाणी उकळून प्यावे.