News Flash

सामाजिक समतोलासाठी ‘ओबीसी’ चेहरा

भाजप व शिवसेनेने ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक अधिकचे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न के ला आहे.

|| मधु कांबळे

प्रादेशिक समन्वयात मात्र कोकण दुर्लक्षित

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी समाजातील नेते नाना पटोले यांची निवड करून पक्षांतर्गत सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्षांच्या खालोखाल कार्याध्यक्ष व उपाध्यक्षपदांवरील नियुक्त्या करताना सामाजिक समीकरणांचा विचार करण्यात आला आहे. परंतु प्रादेशिक समन्वयात कोकण दुर्लक्षित झाल्याचे दिसते.

काँग्रेसला मंत्रिपदे देताना आणि संघटनात्मक पदांवर नियुक्त्या करताना सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्याचा विचार करावा लागल्याचे सांगितले जाते. पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने ओबीसी समाजाकडे विशेष लक्ष के ंद्रित के ल्याचे दिसते. सुशीलकु मार शिंदे, शिवराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी ज्येष्ठ नेत्यांचा संसदीय मंडळात समावेश करून त्यांना संघटनेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.  कार्याध्यक्ष व उपाध्यक्षपदावर नियुक्त्या करतानाही सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न के ला आहे. मंत्रिपदाची संधी न मिळालेल्या प्रणिती शिंदे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न के ल्याचे मानले जात आहे.

प्रादेशिक समन्वय साधताना माणिकराव जगताप यांचा अपवाद वगळता कोकण रिकामेच दिसते आहे. माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे उपाध्यक्षपद, संघटनात्मक कामकाज आणि युती-आघाड्यांची राजकीय रणनीती ठरविणे, उमेदवारी निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे समन्वयक अशा महत्त्वाच्या जबाबादाऱ्या देण्यात आल्या आहेत.

भाजप व शिवसेनेने ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक अधिकचे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न के ला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील  आक्रमक नेता म्हणून प्रतिमा असलेल्या नाना पटोले यांच्याकडे पक्षाच्या राज्यनेतृत्वाची जबाबदारी देऊन नवीन सामाजिक समीकरणे जुळविण्याचाही प्रयत्न दिसतो आहे.

राज्यात या वर्षभरात पाच महानगरपालिका,  ३०० नगरपालिका व नगरपंचायती आणि १७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी मुंबई ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह १७ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायती समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने के लेले  संघटनात्मक व नेतृत्वबदल महत्त्वाचे मानले जात आहे.

पक्षांतर करूनही राज्याची सूत्रे

पक्षांतर करणाऱ्या नेत्याकडे काँग्रेसमध्ये सहसा महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नसे. परंतु भाजपची खासदारकी तसेच आमदारकी भूषविलेल्या नाना पटोले यांच्याबाबतीत काँग्रेस पक्षाने अपवाद के ला आहे.  नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. २००८च्या विधान परिषद निवडणुकीत काही मते फु टल्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि काही आमदारांवर संशयाची सुई वळली. या साऱ्या घडामोडी सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश के ला. ज्येष्ठ आमदार असूनही मंत्रिपद नाकारल्याने पटोले हे तेव्हा काँग्रेस नेतृत्वावर नाराज होतेच. २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले. २०१४ मध्ये मोदी लाटेत भंडारा मतदारसंघातून प्रफु ल्ल पटेल यांचा पराभव करून पटोले हे निवडून आले. भाजपमध्ये महत्त्व मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर लोकसभेतील उपाहारगृहात एकत्र भोजन घेतल्यावर मोदी कसे साधे आहेत याचे  वर्णन पटोले यांनी तेव्हा  वृत्तवाहिन्यांवर के ले होते. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर  पटोले हे प्रसिद्धीच्या झोतात आले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत  पटोले यांना बोलू दिले नाही तेव्हापासून त्यांचे भाजप नेतृत्वाशी बिनसले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 2:49 am

Web Title: obc community leader nana patole as the president of maharashtra pradesh congress akp 94
Next Stories
1 महाविद्यालयात समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्या!
2 टाळेबंदीतही वाचनयात्रा अखंड सुरू
3 ‘देव सुद्धा मला पकडू शकत नाही’; खुलं आव्हान देणाऱ्या ‘खोपडी’ला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Just Now!
X