News Flash

लाचखोर अधिकाऱ्यास अटक

कल्याण-डोंबिवली पालिकेचा प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे व त्यांचा खासगी चालक कय्युम चांदा पाशा शेख या दोघांना तीन लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत

| February 2, 2014 04:00 am

कल्याण-डोंबिवली पालिकेचा प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे व त्यांचा खासगी चालक कय्युम चांदा पाशा शेख या दोघांना तीन लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. बोराडे याच्या सांगण्यावरून कय्युम चांदा याने लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच एका दुकान मालकास एमआरटीपी गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून या लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कल्याणमधील पालिका मुख्यालयासमोरील एका जवाहिऱ्याच्या दुकानात दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम बेकायदेशीर असल्याचे सांगत बोराडे याने दुकान मालक विमल शंकळेशा यांना एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली होती. तसेच हा गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी विमल यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी विमल यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनीटकडे तक्रार केली होती.
कडोंमपाच्या प्रभाग अधिकाऱ्यावर कारवाई वादग्रस्त – बोराडे
कल्याणमधील लालचौकी ते शिवाजी चौक रस्त्यावरील बहुतांशी निवासी बांधकामांचा वाणिज्य वापर सुरू झाला आहे. यामागचे  ‘कर्तेकरविते’ बोराडे हेच असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी बोराडे यांना नियमबाह्य़ ‘साहाय्यक आयुक्तपदी’ बढती देण्यात आली होती. अनेक ‘क्रीम’ पदांचे पदभार त्यांच्याकडे आहेत. अनेक नगरसेवक, अधिकाऱ्यांचे ते ‘अन्नदाते’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चौकशीचा, त्यांनी अनधिकृत बांधकामांबाबत घेतलेल्या संशयास्पद भूमिकांवर नगरसेवकांनी नेहमीच पालिकेच्या महासभेत पडदा टाकण्याचे ‘सत्कर्म’ केले आहे. अनधिकृत बांधकामांची उभारणी आणि त्यामधून उपलब्ध होणारा ‘सहज पैसा’ हेच या अटकेचे कारण समजले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2014 4:00 am

Web Title: officer accepting bribe arrested
टॅग : Bribe
Next Stories
1 मुलाचे अपहरण करणाऱ्या चौकडीला अटक
2 पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू
3 पैशांच्या वादातून एकाची हत्या
Just Now!
X