25 September 2020

News Flash

ओला, उबरचे चालक राज ठाकरेंच्या भेटीला

विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी संप पुकारला आहे

विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी संप पुकारला आहे. संपाचा आज दहावा दिवस असून प्रवाशांचे हाल होत आहे. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाकडून करण्यात आला आहे. यामुळे जवळपास ३० हजार टॅक्सींचा व्यवसायही कोलमडला आहे. दरम्यान ओला, उबरच्या चालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेची वाहतूक सेना चालकांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

ऑनलाईन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रूपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना ओला-उबर गाडय़ा उपलब्ध होताना अडचणच येत आहेत. चालकांच्या मागण्यांवर अद्यापही विचार न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दिसून आले आहे. ओला-उबरची सेवा घेणाऱ्या प्रवाशांना दहाव्या दिवशीही सार्वजनिक वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2018 3:50 pm

Web Title: ola uber driver meet raj thackeray
Next Stories
1 समुद्रातील तेल तस्कर टोळीला मोक्का
2 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात चार शालोपयोगी वस्तूंचे पैसे?
3 झोपडय़ांच्या आगीत संशयाचा धूर!
Just Now!
X