News Flash

ओला-उबर चालक संपावर

मुंबईमध्ये सध्या ४५ हजार कॅब आहेत.

मुंबईमध्ये सध्या ४५ हजार कॅब आहेत. या व्यवसायात येण्यासाठी चालकांनी पाच ते सात लाख रुपये गुंतवले आहेत.

मुंबईसह पुणे, दिल्‍ली, हैदराबाद आणि बेंगळुरूतील ओला, उबरचे चालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाचा फटका देशातल्या प्रमुख शहरातल्या प्रवाशांना बसणार आहे. कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईमध्ये सध्या ४५ हजार कॅब आहेत. या व्यवसायात येण्यासाठी चालकांनी पाच ते सात लाख रुपये गुंतवले आहेत. दीड लाख रुपये प्रति महिना मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यातील अर्धी रक्‍कमही या कंपन्यांनी दिली नसल्याची तक्रार संपकऱ्यांनी दिली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत संप चालूच राहील, असे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 9:26 am

Web Title: ola uber driver on strike from midnight
Next Stories
1 वाशी, चेंबूरजवळ सिग्नलमध्ये बिघाड, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
2 पंतप्रधानांचे ‘मौन’, चंद्राबाबूंचा संघर्ष सुरू; अविश्वास ठरावावरून सेनेचे मोदींवर टीकास्त्र
3 राज ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती पाट्या हटवल्या
Just Now!
X