News Flash

बेस्टनंतर आता ओला-उबरचाही संपाचा इशारा

ओला, उबरचालक पुन्हा संपावर

(संग्रहित छायाचित्र)

बेस्ट कर्मचा-यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आत ओला-उबरच्या चालकांनीही सोमवारपासून संपाचा इशारा दिला आहे. यापूर्वी पुकारलेल्या संपाबद्दल पाच हजार चालकांना शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस मागे न घेतल्यास सोमवारपासून संप सुरू करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये संप केला होता. हा संप जवळपास १२ दिवस चालला होता. अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अधिवेशन संपून प्रदीर्घ काळ उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. परिणामी ओला, उबर चालक पुन्हा संपावर जाणार आहेत.

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यासाठी पुन्हा एकदा ओला, उबर चालकांनी संप पुकारलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2019 2:04 pm

Web Title: ola uber strike once again
Next Stories
1 शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही, उद्धव ठाकरेंचा अमित शाहंना टोला
2 मध्य रेल्वे पकडताना घाई नको, स्टेशन सोडताना गाडी देणार हा असा संकेत
3 Best Strike: सरकारचे नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही – मनसे
Just Now!
X