30 September 2020

News Flash

ओला, उबर संप : जमावाकडून दादर स्थानकावर रेल रोको

२० ते २५ जणांच्या जमावाकडून दादर रेल्वे स्थानकावर रेल रोको

ओला व उबर या खासगी टॅक्सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर सोमवारी संध्याकाळी आपला संप मागे घेतला. मात्र, आज (मंगळवारी) सकाळी २० ते २५ जणांच्या जमावाने दादर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्याचा प्रयत्न केला.

रेल रोको करणारे ओला, उबरचे चालक होते असा आरोप होत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य कामगार संघाने हा आरोप फेटाळला आहे. ओला, उबर चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या लोकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्र. दोनवर २० ते २५ जणांच्या जमावाने रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. केवळ ५ ते ७ मिनिट हा रेल रोको करण्यात आला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी रेल रोको करणाऱ्या जमावास रुळावरुन हटवले आणि रेल्वेसेवा पूर्ववत सुरु झाली.

यापूर्वी शनिवारपासून ओला-उबर चालकांनी पुन्हा संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र, सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी संप मागे घेतला होता. दिवाळीपूर्वीही बारा दिवस सुरू राहिलेला संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर १५ नोव्हेंबपर्यंत स्थागित करण्यात आला होता.

काय आहे मागण्या –
संघटनेकडून १३ मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये मिनी, मायक्रो, गो गाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर १२ रुपयेऐवजी ५० रुपये बेस फेअर द्यावा, प्रतीक्षा कालावधी दर दोन रुपये मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे. पाहा व्हिडीओ –

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 2:14 pm

Web Title: ola uber strike rail roko at dadar station
Next Stories
1 ‘मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटलांनी विठ्ठलाला साकडं घालून शंका निर्माण केली’
2 अध्यक्षांच्या दिशेने कागदं भिरकावली, राजदंड पळवण्याचा मुस्लिम आमदारांचा प्रयत्न
3 ‘घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवू नका’
Just Now!
X