27 September 2020

News Flash

वयोवृद्धाला तीन लाखांचा ऑनलाइन गंडा

केवायसी अद्ययावत न के ल्यास पेटीएम खाते २४ तासांत बंद होईल, अशी सूचना लघुसंदेशात होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : देश-विदेशात पाठीराखे असलेल्या धर्मगुरूंचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत वयोवृद्धाला ऑनलाइन भामटय़ांनी पेटीएम केवायसीच्या नावे तीन लाख रुपयांचा गंडा घातला.

तक्रारदार ७७ वर्षांचे असून मलबार हिल परिसरातच वास्तव्य करतात. दोन दिवसांपूर्वी त्यांना पेटीएम के वायसीबाबतचा लघुसंदेश प्राप्त झाला. केवायसी अद्ययावत न के ल्यास पेटीएम खाते २४ तासांत बंद होईल, अशी सूचना लघुसंदेशात होती. त्याखाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्र मांकावर तक्रोरदाराने संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना‘टीम व्ह्य़ूअर’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप एखाद्याचा संगणक किं वा भ्रमणध्वनी परस्पर हाताळण्याची मुभा देतो. ही बाब माहीत नसल्याने वृद्धाने अ‍ॅप डाऊनलोड के ले. तसेच संबंधित व्यक्तीच्या सूचनेनुसार क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे प्रत्येकी एक रुपया पेटीएम खात्यावर जमा केला. हे व्यवहार सुरू असताना संबंधित व्यक्तीने तक्रोरदाराला बोलण्यात गुंतवले. बोलणे पूर्ण होण्याआधीच तक्रोरदाराच्या डेबिट कार्डवरून एक लाख १७ हजार तर क्रेडिट कार्डवरून एक लाख ९७ हजार रुपये परस्पर वळते केले. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 1:00 am

Web Title: old man cheated of rs 3 lakh in online fraud zws 70
Next Stories
1 डहाणू-चर्चगेट लोकल चालवा
2 करोनाकाळातील माणुसकी.. पोलिसांनी अनुभवलेली!
3 धारावी पुनर्विकासाची गरज
Just Now!
X