21 September 2020

News Flash

न्यायालयात वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

पार्किंगच्या जागेच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियरसोबत गेले वर्षभर न्यायालयीन लढा देणाऱ्या ८० वर्षांच्या निवृत्त सेनाधिकाऱ्याचा शुक्रवारी न्यायालयातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे

| December 19, 2012 06:43 am

पार्किंगच्या जागेच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियरसोबत गेले वर्षभर न्यायालयीन लढा देणाऱ्या ८० वर्षांच्या निवृत्त सेनाधिकाऱ्याचा शुक्रवारी न्यायालयातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.
इंदर दुग्गल हे निवृत्त आणि वयोवृद्ध जवान पुण्याच्या कोंडवा येथील सैनिक वसाहतीत राहत होते. त्यांचे शेजारी निवृत्त ब्रिगेडियर असीलसिंग यांच्याशी त्यांचा घरासमोरील जागेमध्ये गाडय़ा उभ्या करण्यावरून बरीच वर्षे वाद होता. २००८ मध्ये हा वाद न्यायालयात पोहोचला. एवढी वर्षे सुरू असलेला वाद या वर्षी उच्च न्यायालयात आला. दुग्गल यांच्याविरुद्ध सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्यासमोर सुनावणी होणार होती. त्यांचे प्रकरण ५९ व्या क्रमांकावर होते. तरीही दोघेही न्यायालयात हजर होते. न्यायालयाचे कामकाज सुरू होऊन १५ मिनिटे होत आली असतानाच खुर्चीवर बसलेले दुग्गल अचानक जमिनीवर कोसळले. न्यायालयात हजर असलेल्यांनी तात्काळ त्यांना सावरण्याचा प्रयत्न करून खुर्चीवर बसविले. त्यांच्या खिशातील एक गोळीही त्यांना भरविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुग्गल काहीच हालचाल करीत नव्हते. अखेर न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी खुर्चीसहच दुग्गल यांनी न्यायालयाबाहेर आणून गोकुळदास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ज्यांच्यामुळे दुग्गल यांना या वयात न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या, त्या ब्रिगेडियर सिंग यांनीच दुग्गल यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:43 am

Web Title: old person dead in court by heart attack
टॅग Court
Next Stories
1 चित्रा साळुंखेंना सेवेत पुन्हा सामावून घेण्याचे आदेश
2 ‘आदर्श’ प्रकरण हरित न्यायाधिकरणाकडे आपोआप वर्ग होऊ शकत नाही
3 दिराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून
Just Now!
X