30 September 2020

News Flash

ताबा सुटलेल्या इनोव्हा गाडीखाली वृद्ध महिला ठार

डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरखडी भागातील सेंट जोसेफ शाळेजवळ एका भरधाव इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पदपथावर चढली.

| June 19, 2014 12:04 pm

डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरखडी भागातील सेंट जोसेफ शाळेजवळ एका भरधाव इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पदपथावर चढली. या पदपथावर गजरे विकणाऱ्या एका वृद्ध महिलेला या गाडीने उडवल्याने ही महिला जागीच ठार झाली. याबाबत गाडीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
सेंट जोसेफ शाळेजवळील पदपथावर ही वृद्ध महिला नेहमी गजरे विकायला बसत असे. बुधवारी ही महिला येथे बसली असताना चंदेरी रंगाची एक इनोव्हा गाडी भरधाव वेगात आली. या गाडीचा चालक ओंकार विचारे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पदपथाच्या दिशेने सुसाट आली. काही कळायच्या आतच या गाडीने पदपथावर बसलेल्या वृद्ध महिलेला चिरडले. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत ओंकार विचारे याला ताब्यात घेतले आहे.
या महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून गाडीचा चालक आणि गाडी आमच्या ताब्यात आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:04 pm

Web Title: old woman death in innova car accident
Next Stories
1 तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक
2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
3 लोअर परळ कारशेडमध्ये कामगाराचा अपघाती मृत्यू
Just Now!
X