News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक

९ जुलैला एका आरोपीला करण्यात आली होती अटक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. यावेळी अज्ञातांनी घराच्या काचांवर दगडफेक केली होती. तसंच या हल्ल्यात राजगृहातील कुंड्यांचंही नुकसान झालं होतं. या प्रकरणी उमेश जाधव या आरोपीला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज (बुधवार) विशाल मोरे नावाच्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

राजगृहावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता. तसंच पोलिसांनीही त्वरित घटनास्थळाची पाहणी करत तपासाला सुरूवात केली होती. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल मोरे याला आज (बुधवार) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसंच या घटनेतील अन्य आरोपी उमेश जाधव याला ९ जुलै रोजीच अटक करण्यात आली होती.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे. दरम्यान या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या घटनेनंतर सर्वांना शांतात राखण्याचं आवाहन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 9:13 pm

Web Title: olice arrested vishal ashok the main accused in the incident where premises of dr br ambedkars house rajgruha vandalised jud 87
Next Stories
1 करोना चाचणीचे दर आणखी कमी होणार!
2 ‘कोकिलाबेन’ रुग्णालयात मुंबईतील पहिलं हृदयप्रत्यारोपण यशस्वी
3 Corona: पत्नीला घेऊन पतीची धावाधाव, १२ तासात चार रुग्णालयांनी नाकारलं; अखेर सायन रुग्णालयात मृत्यू
Just Now!
X