13 August 2020

News Flash

दिल्लीतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला मुंबई अटक

हा आरोपी मुंबईहून कतार येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. कारण मुंबई-कतार विमान तिकीट त्याच्याकडे आढळून आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

दिल्लीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पोलिसांना गुंगारा देत पोबारा केलेल्या फरारी आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि दिल्ली पोलिसांच्या स्वाधिन केले.

महंम्मद डुकरे शम्मीर अन्सारी (वय ३२) असे या आरोपीचे नाव आहे. हा मुळचा बिहारच्या लेहरी सराई येथील रहिवाशी आहे. दिल्लीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याने पलायन केले होते. दिल्ली पोलीस त्याच्या शोधात होती, दरम्यान दिल्ली पोलिसांनी लूक आउट नोटीस बजावल्याचे मुंबई पोलीसांतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

हा आरोपी मुंबईहून कतार येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. कारण मुंबई-कतार विमान तिकीट त्याच्याकडे आढळून आले आहे. गेल्यावर्षी आरोपी अन्सारी याच्यावर दिल्लीच्या संगमबिगार पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, फरारी आरोपी हा विदेशात जाणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना असल्याने त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस बजावण्यात आली होती.

अखेर वर्षभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अन्सारीला सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी अन्सारीला वांद्रे न्यायालयात नेले असता त्याला दोन दिवसांचा ट्रान्झिस्ट रिमांड देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2019 1:32 am

Web Title: on minor girl rape convicted from delhi arrested at mumbai
Next Stories
1 काँग्रेसच्या पत्राला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्युत्तर
2 धावत्या लोकलवर दगडफेक, ठाणेकर प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा
3 सरकारविरोधात रणनिती आखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक
Just Now!
X