‘टीआयएफआर’ने विकसित केलेल्या तीन उपकरणांचा समावेश; नासाच्या एक पाऊल पुढे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज पंडित, मुंबई<br /> चंद्र आणि मंगळापर्यंत मजल मारलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी आखणी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असून देशाचा पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह अवकाशाकडे झेपावणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासापेक्षाही एक पाऊल पुढे असेल हे उपग्रह खगोलशास्त्रातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात यशस्वी होऊ शकणार आहे.
खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आजपर्यंत विविध देशांनी स्वतंत्र उपग्रह सोडलेले आहेत. भारतानेही यापूर्वी काही छोटेखानी उपग्रह अवकाशात सोडले होते. पण या उपग्रहांच्या मुख्य उद्देशातील एक उद्देश हा खगोलशास्त्राचा अभ्यास असावयाचा. पण आता केवळ खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ पाठविले जाणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील हालचालींचा वेध घेणे आपल्याला शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर अवकाशातील अतिनील, कमी आणि उच्च क्षमतेच्या लहरी, कृष्णविवरसारख्या विविध हालचालींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे. अशा प्रकारे बहुद्देशीय अभ्यास करणारा हा पहिलाच उपग्रह असल्यामुळे या अभ्यासात इस्रो नासापेक्षा एक पाऊल पुढे राहणार आहे. या उपग्रहातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’, ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ आणि ‘कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ उपकरणे मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) वैज्ञानिकांनी विकसित केलेले आहेत. यातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’ हे डॉ. के. पी. सिंग यांच्या चमूने विकसित केले आहे. तर ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ हे उपकरण डॉ. जे. एस. यादव यांच्या चमूने विकसित केले असून याचा वापर अंतराळात विविध लहरींच्या उत्सर्जनाचा, आकाशगंगेची केंद्रके आणि अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या किरणांच्या उगमाचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. तर ‘कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ हे उपकरण डॉ. ए. आर. राव यांच्या चमूने विकसित केले आहे.
उड्डाणाची वैशिष्टय़े
’ हा उपग्रह १५१३ किलो वजनाचा आहे.
’ हा उपग्रह ६५० किमीच्या कक्षेत असेल.
’ याचे उड्डाण सोमवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळा केंद्रातून पीएसएलव्ही-सी३०च्या माध्यमातून होणार आहे.
’ या उपग्रहासोबत पीएसएलव्हीमध्ये इंडोनेशिया आणि कॅनडाचा प्रत्येकी एक आणि अमेरिकेचे चार उपग्रह अवकाशात पाठविले जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On monday the countrys first astronomical satellite flight
First published on: 25-09-2015 at 06:03 IST