News Flash

‘पुन्हा एकदा प्लेझर बॉक्स’

वपु यांच्याविषयीचा चाहत्यांचा पत्रव्यवहार आणि त्यांच्या कन्येने रेखाटलेले त्यांचे भावचित्र यावर आधारित हे कार्यक्रम असणार आहेत.

 

व. पु. काळे यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

मुंबई : मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या साहित्याची ओळख तरुण पिढीस व्हावी या उद्देशाने त्यांच्या जयंतीदिनी २५ मार्चला साहित्यसंपदा समूहाने विशेष कार्यक्रमांचे आयोजन के ले आहे. वपु यांच्याविषयीचा चाहत्यांचा पत्रव्यवहार आणि त्यांच्या कन्येने रेखाटलेले त्यांचे भावचित्र यावर आधारित हे कार्यक्रम असणार आहेत.

वपु हयात असताना त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पाठवलेली पत्रे अतिशय सर्जनशीलतेने एकत्र गुंफत वपु यांनी ‘प्लेझर बॉक्स’ हे दोन भागांतील पुस्तक  लिहिले. त्यात त्यांनी आपल्या काही आठवणीही गुंफल्या आहेत. वपु यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्वाती काळे-चांदोरकर यांनी या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात योगदान देत वडिलांविषयी लेखन के ले आहे. याच संकल्पनेच्या पाश्र्वाभूमीवर साहित्यसंपदा फे सबुक समूहाने ‘प्लेझर बॉक्स पुन्हा एकदा’ या उपक्रमांतर्गत वपु यांना पत्र लिहिण्याचे आवाहन त्यांच्या चाहत्यांना के ले आहे. आतापर्यंत १८ पत्रे समूहाकडे जमा झाली आहेत.

यात चाहत्यांनी वपु यांचे लेखन, विचार, आवडती वाक्ये, वपु यांच्या लेखनाचा जीवनावरील परिणाम यांविषयी लिहिले आहे. ही सर्व पत्रे स्वाती यांना पाठवली जातील. काही निवडक पत्रांना त्या स्वत: उत्तरे देतील. तसेच सर्व पत्रे एकत्र करून एक दीर्घ पत्र तयार केले जाणार आहे.

चतुरस्रा व्यक्तिमत्त्व असलेल्या वपु यांच्या साहित्यिक, कलामय आणि त्यापेक्षाही प्रापंचिक व्यक्तिमत्त्वाचा मागोवा स्वाती यांनी ‘वपु’ या छोटेखानी पुस्तकात नेमकेपणाने घेतला आहे. रूढार्थाने हे चरित्र नाही तर प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती वडील म्हणून किंवा इतर सांसारिक नात्यात कशी दिसली, याचे हे ‘भावचित्र’ आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वपु यांचा जीवनप्रवास वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वाती यांची ऑनलाइन मुलाखत २५ मार्चला रात्री ८ वाजता साहित्यसंपदा फेसबुक पेजवरून प्रक्षेपित केली जाणार आहे.

उपक्रम काय?

‘मला भावलेली व्यक्तिरेखा’ या उपक्रमांतर्गत वपु यांच्या प्रसिद्ध साहित्यातील एखाद्या व्यक्तिरेखेविषयी १ हजार शब्दांत लिहून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय मुलांसाठी  ‘माझा आवडता लेखक -व पु काळे’ या विषयावर निबंध स्पर्धा पार पडणार आहे.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल. प्रौढ गटासाठी वपु यांच्या कथांचे अभिवाचन पार पडणार असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

Sahityasampada7nov18@gmail.com या पत्त्यावर आपले

निबंध १९ मार्चपर्यंत पाठवता येईल. संपर्क  – ९९३००८०३७५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:29 am

Web Title: once again pleasure box akp 94
Next Stories
1 गुंगीचे औषध देऊन मोबाइल चोरी करणारा अटकेत
2 झोपडपट्टीत ४६ तर गृहनिमार्ण संकुलात २१ टक्के बाधित
3 मुंबईत रुग्णवाढीचा दर सरासरी ०.४२ टक्क्यांवर
Just Now!
X