19 January 2021

News Flash

राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत

मुख्य आरोपीने राजगृह बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अटक आरोपी बाहेर पहारा देत होता.

संग्रहित छायाचित्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील तोडफोडप्रकरणी गुरुवारी माटुंगा पोलिसांनी उमेश जाधव (३५) या तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपीने राजगृह बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अटक आरोपी बाहेर पहारा देत होता.

जाधव परळ टीटी परिसरात वास्तव्यास असून बिगारी काम करतो. त्याच्या चौकशीतून मुख्य आरोपीबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती आली असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:35 am

Web Title: one accused arrested in rajgruha vandalism case abn 97
Next Stories
1 विरार-अलिबाग महामार्गाच्या उभारणीला प्राधान्य
2 ‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा आज निकाल
3 ‘कुलगुरूंनाच परीक्षा नको’
Just Now!
X