News Flash

महिलेची हत्या करून एकाची आत्महत्या

आरोपी मृत महिलेचा नातलग आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : आपल्या आक्षेपार्ह वर्तनाची महिला पोलिसांत तक्रार करील, या भीतीने तिची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार चेंबूर येथे शनिवारी घडला.

आरोपी मृत महिलेचा नातलग आहे. काही दिवसांपासून तो पीडीत महिलेशी अश्लील वर्तन करीत होता. त्यास महिलेने आक्षेप घेतला होता. तिने याबाबत कुटुंबियांनाही माहिती दिली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला समजही दिली होती. मात्र महिला आपल्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करील, याची त्याला भीती वाटत होती.

शनिवारी तो वाशीनाका परिसरातील भारतनगर म्हाडा वसाहतीत महिलेच्या घरी गेला. त्याने घरातील इतरांना बाहेर काढले आणि महिलेचे डोके खिडकीच्या काचेवर आपटून तिला जखमी केले.

तसेच काचेच्या तुकड्यांनी तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. त्याच काचेने त्याने स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:45 am

Web Title: one commits suicide by killing a woman akp 94
Next Stories
1 एकमजली संरक्षित झोपड्यांवर कारवाई नको!
2 बदली धोरणात शिक्षक दांपत्याच्या एकत्र नियुक्तीस प्राधान्य नाही!
3 शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया
Just Now!
X