पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने उद्या (शुक्रवार) एकदिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बस, खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी सहभागी होतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोल नाक्यावर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यावर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, विमा हप्त्यात कपात करावी, स्कूल बसच्या चेसिसवरील एक्साईज ड्यूटी माफ करावी, आरटीओकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करून ती स्कूल बस सेफ्टी समितीकडून करावी, शाळेभोवत पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी बंदची हाक देण्यात आली आहे.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
dombivli shilphata road marathi news, shasan aplya dari dombivli marathi news
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
gaganyan astronauts
गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

या बंदमध्ये स्कूल बस, ट्रक, लक्झरी बस, टेम्पो, खासगी कॅब, टुरिस्ट कार आदी वाहने संपात सहभागी होतील. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे.