निवडणूक ओळखपत्र व आधार कार्ड तयार करणाऱ्या सहा तरूणांनी दोन दिवसांपूर्वी तयार केलेला शिळा भात खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यापैकी भूपेंद्र खांडेकर या तरुणाचा मृत्यु झाला.अमित रंगारी, भास्कर वाघमारे, अमरदीप देशमुख, प्रवर्तक उके, चंद्रशेखर चोले यांनाही विषबाधा झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरूणांनी शनिवारी शिळा भात खाल्ला होता. त्यांना उलटय़ा जुलाब झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. भूपेंद्रला बरे वाटल्याने तो घरी गेला. पण नंतर तो मोबाईल उचलत नसल्याने त्याच्या सहकाऱ्यांना संशय आला. त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तो मृतावस्थेत आढळला.