शनिवारी रात्री पडलेल्या पावसाच्या तुरळक सरींमुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्याने दुचाकीवरील एकाचा बळी घेतला. जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलावर एक दुचाकी घसरल्यानंतर मागील तीन वाहनांनी ब्रेक लावले खरे; पण या गाडय़ांना त्यामागून येणाऱ्या भरधाव एसटीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वारामागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. अफझल मुस्तफा शेख (४५) असे त्याचे नाव आहे. अफझल हा दुबेर हुसेन शेख (२४) याच्यासोबत
दादर खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी एसटी चालक सुरेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.