News Flash

भक्ताने ‘लालबागच्या राजा’ला अर्पण केली ४२ लाखांची हिरेजडीत सोन्याची गणेश मूर्ती

लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून भक्तांची रांग लागली आहे. पहिल्या पाच दिवसातच राजाच्या चरणी कोटयावधी रुपयाचे दान जमा झाले आहे.

लालबागचा राजा

‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून भक्तांची रांग लागली आहे. पहिल्या पाच दिवसातच राजाच्या चरणी कोटयावधी रुपयाचे दान जमा झाले आहे. राजाच्या एका भक्ताने तब्बल एक किलो २७१ ग्रॅम वजनाची हिरेजडीत सोन्याची मूर्ती अर्पण केली आहे. सोन्याची ही मूर्ती लालबागच्या राजाचीच प्रतिकृती असून या मूर्तीची किंमत तब्बल ४२ लाख रुपये आहे. पाहताक्षणी लक्ष वेधून घेणाऱ्या या मूर्तीच्या मुकुटामध्ये एक हिरा असून जवळपास १ लाख रुपये या हिऱ्याची किंमत आहे.

दररोज देशाच्या वेगवेगळया भागातून मोठया संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहे. अवघ्या पाच दिवसात दोन कोटी ६४ लाखांचे दान जमा झाले आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी न चुकता राजाच्या दर्शनाला येतात. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांनी कालच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आज सकाळी सचिन तेंडुलकरने सपत्नीक राजाचे दर्शन घेतले. मागच्यावर्षी सुद्धा एका भक्ताने ३१.५ लाखाची सोन्याची मूर्ती लालबागच्या राजाला अर्पण केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:16 pm

Web Title: one devotee donate 42 lakh ganesh idol to lalbaughcha raja
Next Stories
1 काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल
2 ‘गणपती बाप्पा, फडणवीस सरकारला इंधनाच्या किंमती कमी करण्याची सुबुद्धी दे रे!’
3 बंधाऱ्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू
Just Now!
X