News Flash

मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू; ३५ जखमी

भिवंडीत दहीहंडी बांधताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

भिवंडीत दहीहंडी बांधताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजच्या दहीहंडीला उत्सवाला गालबोट लागल्याचे चित्र आहे.
गणेश अनंत पाटील (२९) असे मृत पावलेल्या गोविंदाचे नाव आहे. दहीहंडी बांधतांना खांब डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. गणेश हा दिघाशी या गावाचा रहिवासी असून त्याचे नुकतेच लग्न झाले होते. दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आतापर्यंत ३५ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांना नायर, केईएम, राजावाडी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या या गोविंदामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे रुग्णलयाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 3:07 pm

Web Title: one govinda died
टॅग : Govinda
Next Stories
1 शीना हत्याकांडाला आरुषी प्रकरण बनू देणार नाही – राकेश मारिया
2 बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळाला
3 दत्तकविधान खडतर
Just Now!
X