27 November 2020

News Flash

शिवडी कोर्टनाका येथील अपघातात एकाचा मृत्यू

चालकासह सात जण जखमी

(संग्रहित छायाचित्र)

शिवडी कोर्ट नाका येथील जकेरीया बसथांब्याजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रविवारी एकाचा मृत्यू आणि चालकासह सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

शाहबाज इलियास बारी (२६) हा त्याची पत्नी अमरिन बारी (२५) हिच्यासह शिवडी कोर्ट नाका येथील जकारिया रस्त्यावरून इर्टिका मोटारमधून संध्याकाळी सहाच्या सुमारास माझगावच्या दिशेने जात होता. वेगात असताना शाहबाजचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार जवळील जकारिया बसस्थानकावर धडकली.

बसस्थानकावर उभे असलेल्या नागरिकांपैकी दर्शन पाटील (१८) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे, तर कल्पेश घारसे (२५), स्वाती पाटील (४०), निधी पाटील (१२), गौरी मांडवकर (४०), जय मांडवकर (१३) जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.

मोटार पुढे ट्रकला धडकल्याने बारी दाम्पत्यालाही इजा झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून  शाहबाज आणि अमरिन यांना ताब्यात घेतले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.

रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी दर्शन पाटील याला रुग्णालयात आल्यानंतर मृत म्हणून घोषित केले गेले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बांगर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:39 am

Web Title: one killed in accident in sewri courtnaka
Next Stories
1 डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणाच्या तपासात संदिग्धता
2 करिअरविषयक प्रश्नांना तज्ज्ञांची उत्तरे
3 ७० हजार गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला गती!
Just Now!
X