27 May 2020

News Flash

राज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

 

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या बंदीच्या काळात राज्यातील अपंग व्यक्तींना एक महिना पुरेल इतके  अन्नधान्य तसेच आरोग्यविषयक साहित्य घरपोच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे करोनाच्या लढाईत सर्व दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बंदीच्या काळात (लॉकडाऊन) हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधान्यात कडधान्ये, डाळी, तांदूळ, तेल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर  सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल अशा आरोग्यविषयक साहित्याचेही वाटप करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्य़ाच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात यावे असेही सूचित करण्यात आले आहे. राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

याशिवाय ज्या ज्या ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार आहेत.

दिव्यांग व्यक्तींना बँका, पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात याव्यात, असेही या निर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे. मनोरुग्ण, बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिक शेलटर होम, आश्रम किंवा बालगृहात करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आले असून निवृत्तिवेतनधारक  लाभार्थी दिव्यांगांना एक महिन्याचे निवृत्तिवेतन आगाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाद्वारे प्रत्येक जिल्ह्य़ाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांना एक हेल्पलाइन नंबर टोल फ्री स्वरूपात प्राप्त करून द्यावा व त्याबाबत सर्व दिव्यांगांना विविध माध्यमांतून माहिती देण्यात यावी, जेणेकरून या सर्व सुविधा मिळवण्याबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्व दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्यविषयक सुविधा सामान्य माणसाप्रमाणे मिळाव्यात व कोणत्याही अतिदिव्यांग, बेवारस आदी व्यक्तींचे हाल होऊ नयेत असा आमचा प्रयत्न असल्याचे राज्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

बंदीच्या काळात (लॉकडाऊन) हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधान्यात कडधान्ये, डाळी, तांदूळ, तेल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर  सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल अशा आरोग्यविषयक साहित्याचेही वाटप करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:16 am

Web Title: one month food health supplies will be provided to all persons with disabilities in the state abn 97
Next Stories
1 घरकोंडीमध्ये सापडलेल्या बालक-पालकांच्या साथीला ‘किशोर’
2 पर्यटन महामंडळाचे लक्ष आता मे महिन्यातील आरक्षणावर!
3 ‘एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट वेतन द्या’
Just Now!
X