22 October 2020

News Flash

पोलीस भरतीचा आणखी एक बळी

मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गेल्या काही दिवसांत उमेदवारांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर आज(शनिवार) राहुल सकपाळ या आणखी एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे

| June 14, 2014 12:00 pm

मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गेल्या काही दिवसांत उमेदवारांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर आज(शनिवार) राहुल सकपाळ या आणखी एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. पोलीस भरतीसाठी मालेगावहून मुंबईत आलेल्या अंबादास सोनावणे (२७) या तरुणाचा बुधवारी धावताना धाप लागून मृत्यू झाला होता. यावेळी राहुल सकपाळसुद्धा जखमी झाला होता, त्यानंतर राहुलला भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून राहुल बेशुद्धावस्थेतच होता. दरम्यान, राहुलला तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना १,३०,००० रुपयांचे बील भरण्यास रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 12:00 pm

Web Title: one more aspiring policeman dies in mumbai
टॅग Police Recruitment
Next Stories
1 घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा
2 चितळे समितीचा अहवाल विधीमंडळात सादर
3 प्रकल्प खर्चानुसार तिकिट दरवाढ!
Just Now!
X