News Flash

मुंबईत होतकरू मॉडेलची आत्महत्या

झगमगाट आणि प्रसिद्धीपलीकडील एक बाजू..

फॅशन जगताला हादरा देणारी आणखी एक घटना नुकतीच अंधेरीच्या चार बंगला परिसरात घडली आहे. मॉडलिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या नेहा कौर या होतकरु मॉडेलने राहत्या घरी घळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर तिला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंधेरीतील चार बंगला या भागात असणाऱ्या सहजीवन इमारतीत आपल्या मैत्रिणीसोबत राहणाऱ्या नेहाने वयाच्या २७ व्या वर्षी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच स्वत:चे आयुष्य संपवले. सदर घटनेनंतर पोलीस यंत्रणांनी तपास प्रक्रियेला सुरुवात केली असून लवकरच पोलिसांना आत्महत्येमागील कारण सापडेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान घटनास्थळावरुन कोणत्याही प्रकारची चिठ्ठी अथवा कोणताही इतर सबळ पुरावा मिळाल्याची माहीती अजूनही मिळालेली नाही.
झगमगाट आणि प्रसिद्धीपलीकडेही एक काळी बाजू असणाऱ्या फॅशन जगतातील मॉडेलची आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही नानाविध कारणांनी अनेक मॉडेल्सनी या विश्वापासून फारकत घेण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडल्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:29 pm

Web Title: one more model committed suicide in mumbai
Next Stories
1 आपल्याच मुख्यमंत्र्यांची बेइज्जती हे तर राक्षसराज; सेनेचा पंकजा मुंडेंवर निशाणा
2 सुन्या सुन्या मंडईत माझ्या..
3 गरीबनगरमधील बहुमजल्यांवर अखेर हातोडा
Just Now!
X