कल्याणमध्ये आणखी एक करोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी परदेशात जाऊन आला होता. ६ मार्च रोजी तो भारतात परतला. मात्र त्यावेळी त्याला काहीही त्रास जाणवला नाही. त्यानंतर ११ मार्च रोजी त्याला त्रास जाणवू लागला. १२ मार्चला हा रुग्ण केडीएमसीच्या रुक्मिणी रुग्णालयात गेला. तिथे त्याला कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. ज्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या सगळ्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये आणखी रुग्ण सापडल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. कल्याणमधील करोनाग्रस्तांची संख्या ही आता दोन झाली आहे. मात्र कुणीही घाबरु नये असं आवाहन महापालिकेने केलं आहे. एका मराठी व

कल्याणमध्ये आणखी एक करोनाग्रस्त आढळल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ वर गेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयं, मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ ही लागू करण्यात आले आहे. सर्वतोपरी खबरदारी घेण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. शनिवारी एका दिवसात महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही १२ ने वाढली होती. आज औरंगाबादमध्ये एक आणि कल्याणमध्ये १ असे दोन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ वर गेली आहे.

मॉल्स, शाळा, महाविद्यालयं, जिम्स, स्विमिंग पूल हे सगळं बंद करण्याचे आदेश शनिवारीच देण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर याचा काही परिणाम झालेला नाही.