मधुमेह असलेल्या ६४ वर्षांच्या वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे ऑगस्टमधील मृत्यूंची संख्या दहावर गेली आहे. स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या २३२९ वर पोहोचली आहे. वडाळा येथील ६४ वर्षांच्या व्यक्तीला धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्यांना वोकहार्ट रुग्णालयात हलवण्यात आले. स्वाइन फ्लूची शक्यता वाटल्याने १२ ऑगस्टपासून त्यांना ओसेल्टामिव्हीर गोळ्या देण्यास सुरुवात झाली. मात्र मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा विकार असलेल्या या वृद्धाचा १५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ऑगस्टच्या पहिल्या पंधरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या मृत्यूंमध्ये चार वृद्ध, दोन महिला व तीन मुलांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 1:37 am