28 September 2020

News Flash

एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांची हत्या

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची घटना दहिसर येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ब्रिजेश चौहान (२२) याला अटक केली आहे. दहिसरच्या

| December 19, 2012 06:45 am

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची घटना दहिसर येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ब्रिजेश चौहान (२२) याला अटक केली आहे.
   दहिसरच्या शांतीनगर येथे राहणाऱ्या जोिगदर सिंग (३६) यांचा फुलं सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. या कामासाठी त्यांनी आपल्या गावातून ब्रिजेश चौहान याला मदतीला आणले होते. तो जोगिंदर यांचा लांबचा नातेवाईक आहे.आरोपी  ब्रिजेश हा जोिगदर यांच्याचा साई कृपा महल वेल्फेअर सोसायटीत रहात होता. दरम्यानच्या काळात ब्रिजेश जोगिंदर यांच्या मुलीवर प्रेम करत होता. जोिगदर यांना त्याची कुणकुण लागली आणि त्यांनी मुलीला उत्तरप्रदेश येथे पाठवून त्याचे लग्न ठरविले.
चार महिन्यानंतर त्यांच्या मुलीचे लग्न होते. त्याची तयारी घरात सुरू होती. ब्रिजेशने जोिगदर यांना भेटून तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला जोिगदर यांनी विरोध केला .यामुळे वैफल्यग्रस्त आणि संतापलेल्या ब्रिजेशने मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास झोपेत असणाऱ्या जोिगदरसिंग यांची गळा दाबून हत्या केली.ब्रिजेशला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांनी दिली.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:45 am

Web Title: one sided love murderd lovers father
Next Stories
1 न्यायालयात वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
2 चित्रा साळुंखेंना सेवेत पुन्हा सामावून घेण्याचे आदेश
3 ‘आदर्श’ प्रकरण हरित न्यायाधिकरणाकडे आपोआप वर्ग होऊ शकत नाही
Just Now!
X