21 September 2020

News Flash

पोलिसांच्या हातात बॅगा ठेवून तरुण फरार

मुंबईतील कुर्ला टर्मिनल स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनच्या दरम्यान एक अज्ञात इसम पोलिसांच्या हातात दोन बॅगा ठेवून फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या

| March 31, 2013 02:57 am

मुंबईतील कुर्ला टर्मिनल स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनच्या दरम्यान एक अज्ञात इसम पोलिसांच्या हातात दोन बॅगा ठेवून फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी एक इसम रेल्वे स्थानकावर संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता बॅगेला कुलूप असल्याचे कारण त्या इसमाने दिले. त्यानंतर पोलिसांनी कुलूप खोलण्यास सांगितल्यानंतर चावी भावाजवळ आहे ती घेऊन येतो, असे सांगून गेलेला इसम परत आलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या दोन्ही बॅगा पोलीसठाण्यात आणून उघडल्यानंतर त्यामध्ये मोबाईल, रोख एक लाख रुपये सापडले.
या दोन्ही बॅगांमधील मुद्देमाल दीड लाख रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत कुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:57 am

Web Title: one suspect runaway by giveing bags to police man
Next Stories
1 मुंबईतील आरोपींना राजस्थानातून अटक
2 १६ वर्षीय मुलीवर ठाण्यात बलात्कार
3 ठाण्यातील बिलबॉंग शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस
Just Now!
X