11 August 2020

News Flash

बीकेसी रुग्णालयातील एक हजार रुग्ण करोनामुक्त

बीकेसीतील एक हजार खाटांच्या या रुग्णालयातून ५० वर्षांवरील ४५२ रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले.

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकु लाच्या मैदानावर उभारलेल्या करोना रुग्णालयातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून अद्याप एकाही मृत्यूची नोंद या रुग्णालयात झालेली नाही.

बीकेसीतील एक हजार खाटांच्या या रुग्णालयातून ५० वर्षांवरील ४५२ रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले. या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब इतर आजारही होते. मात्र वेळेत उपचार आणि योग्य काळजी घेतल्याने हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णालयात १,७५४ रुग्णांवर उपचार दिले असून यातील १,००९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे यातील ४५ टक्के रुग्ण पहिल्या पाच दिवसांतच बरे झाल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सागितले.

‘निसर्ग’ वादळानंतर रुग्णालयात दाखल झालेल्यांची ही आकडेवारी आहे. रुग्णालयात एक हजार खाटांपैकी ५०० खाटांवर ऑक्सिजनची सोय आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे उपचार दिले जात असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:31 am

Web Title: one thousand patients in bkc hospital recovered from coronavirus zws 70
Next Stories
1 जुन्या वादातून शेजाऱ्याच्या मुलाचा खून
2 मानखुर्दमधील अंध व्यक्तीकडून रक्तद्रव दान
3 पार्लर, केशकर्तनालयांसाठी शासकीय नियमावली
Just Now!
X