News Flash

प्राप्तीकर आयुक्तांच्या गाडीच्या धडकेत महिला जखमी

हाजी अली उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या प्राप्तीकर आयुक्त टी. के. शहा यांच्या गाडीने शनिवारी रात्री दोन टँक्सींना धडक दिली. त्यात दोन महिला

| January 22, 2013 03:21 am

हाजी अली उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या प्राप्तीकर आयुक्त टी. के. शहा यांच्या गाडीने शनिवारी रात्री दोन टँक्सींना धडक दिली. त्यात दोन महिला जखमी झाल्या. तर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची धडक बसून गिरगाव चौपाटी येथे टॅक्सीचालकाला जखमी केले.
या पुलावरुन एकेरी मार्ग असतानाही मुख्य प्राप्तीकर आयुक्त शहा यांच्या चालकाने विरुद्ध दिशेने पुलावरून गाडी नेली. त्यावेळी या गाडीने समोरून येणाऱ्या दोन टॅक्सींना धडक दिली. त्या धडकेत दोन महिला जखमी झाल्या. पोद्दार रुग्णालयात उपचारानंतर या महिलांना घरी सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक ज्ञानेश्वर शिंदे याला अटक करुन नंतर त्याची जामिनावर सुटका केली. या अपघातात शहा यांना दुखापत झाली नसल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले. दरम्यान, गिरगाव येथे भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या दोन तरुणांच्या धडकेत एक टॅक्सीचालक जखमी झाला. गिरगाव चौपाटीजवळील आयडीयल जंक्शनसमोर शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:21 am

Web Title: one women injured because of income tax officers van accident
टॅग : Income Tax
Next Stories
1 राम कदम यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे आश्वासन
2 बारावीच्या परिक्षावर बहिष्कार घालण्याचा शिक्षकांचा निर्णय
3 ‘शिंदेंनी महाराष्ट्राला लाज आणली’
Just Now!
X