मुंबईनजीक अरबी समुद्रात खनिज तेलाचा मोठा सापडला आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातर्फे (ओएनजीसी) बुधवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. अरबी समुद्रात असणारे ‘मुंबई हाय’ हे भारतातील सर्वात मोठे खनिज तेल उत्खनन केंद्र म्हणून ओळखले जाते. याच क्षेत्रात खोदण्यात आलेल्या WO-24-3 या विहिरीत खनिज तेलाचा मोठा साठा सापडला आहे. या ठिकाणी २ कोटी टन इतका तेलसाठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या मुंबई हाय येथील तेलविहिरींमधून दिवसाला २,०५,००० बॅरल तेलाचे उत्पादन होते. त्यामध्ये आता नव्या तेलसाठ्यांची भर पडणार आहे. येत्या दोन वर्षात नव्या तेल विहीरीतून खनिज तेलाच्या नियमित उत्पादनाला सुरूवात होईल, असे ‘ओएनजीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महागाईत पेट्रोल!

नव्याने सापडलेल्या तेलसाठ्याच्या परिसरातील नऊ क्षेत्रांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये हायड्रोकार्बन घटक आढळून आले. तर शेवटच्या क्षेत्रात तब्बल ३३०० बॅरल खनिज तेल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओएनजीसीने मुंबई हाय क्षेत्रात उत्खननास सुरूवात केल्यापासून तब्बल ५० वर्षांनंतर खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. त्यामुळे ओएनजीसीला दीर्घकालीन विचार करता तेल उत्पादनाचे प्रमाण कायम राखणे, शक्य होणार आहे.

.. राष्ट्रहितासाठीच