News Flash

नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबादमध्येही अकरावीचे प्रवेश ऑनलाइन

विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांचा पर्याय देताना उडणारा गोंधळ कमी होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ; १० महाविद्यालयांचा पर्याय भरण्याची मुभा

मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवडसह येत्या शैक्षणिक वर्षांपासून नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातही अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेतून होणार आहेत. यासाठी प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर बदल करत प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. यात आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५० ऐवजी केवळ १० महाविद्यालयांचाच पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांचा पर्याय देताना उडणारा गोंधळ कमी होणार आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उडालेला गोंधळ लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत होणारे प्रवेश सुलभ करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने ठोस पावले उचलत प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर बदल केले आहेत. नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ १० महाविद्यालयांचे पंसतीक्रम भरावे लागणार आहेत. यापूर्वीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ५० महाविद्यालयांची नावे भरावी लागत होते. याचबरोबर नवीन बदलांनुसार विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेतील वाढता गोंधळ लक्षात घेता आणि या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यातील शिक्षण उपसंचालकांनी एक अहवाल शासनाकडे सादर केला होता. या अहवालावर  चर्चा करण्यासाठी काही मुख्याध्यापक आणि प्राचार्याची बैठक नुकतीच घेण्यात आली होती.

महत्त्वपूर्ण बदल

  • शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना (पहिल्या फेरीमध्ये) संबंधित पालिका क्षेत्रातील कोणतेही किमान एक व जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलताना कितीही पसंतीक्रम देता येणार आहेत.
  • एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे फक्त एकाच शाखेची मागणी करता येईल. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार अर्जातील भाग दोन मधील शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
  • पहिल्या फेरीनंतर विद्यार्थ्यांस प्रत्येक फेरीला उपलब्ध जागांनुसार प्रत्येक फेरीपूर्वी निश्चित केलेल्या कालावधीत पसंतीक्रम बदलता येतील. पसंतीक्रम न बदलल्यास आधीच्या फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. नियमित प्रवेश फेरीपूर्वी कोटय़ातील प्रवेशासाठी शून्य फेरीचे आयोजन केले जाईल. त्यासोबत व्यावसायिक व द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठीच्या आरक्षित जागा भरण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:54 am

Web Title: online admission process for 11th
Next Stories
1 बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तातडीची बैठक
2 बुलेट ट्रेन तोडण्यासाठी नाही, मुंबईला देशाशी जोडण्यासाठी!
3 खाजण जमिनींवर परवडणारी घरे?
Just Now!
X