मुंबई :  अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची संदिग्धता अद्यापही कायम असल्यामुळे आता विज्ञान, वाणिज्य, कला या तिनही शाखांतील अकरावीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या संदिग्धतेमुळे दुसऱ्या फेरीपूर्वी विड्टाागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरलेल्या राज्यातील १४ लाख ३१ हजार ४८३ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ५१ हजार ९८५ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.

मात्र, २ लाख ७९ हजार ४८८ विद्यार्थ्यांना अद्यापही कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळालेला नाही. पुढील फेरीची प्रक्रिया कधी सुरू होणार, पहिल्या फेरीत मिळालेले प्रवेश कायम राहणार का याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचेही महाविद्यालय सुरू झालेले नाही. या विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून (२ नोव्हेंबर) हे वर्ग सुरू होतील.

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत. विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येईल. यासाठी पूर्वनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना तासिकांचे वेळापत्रक आणि तपशील मोबाईल संदेश आणि इ-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात येतील.

नोंदणी करण्याचे आवाहन

ऑनलाइन वर्गासाठी  विद्यार्थ्यांनी  http://covid19.scertmaha.ac.in/eleventh/ या संके तस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी के ल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचे वेळापत्रक आणि आवश्यक तपशील ईमेल, मोबाइल क्रमांकावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.