करोनाच्या प्रादुर्भावामध्ये बहरलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या बाजारपेठेत अनेक विद्यापीठांनी व्यावसायिक आणि तंत्रज्ञान विद्याशाखांची ऑॅनलाइन पदवी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, या अभ्यासक्रमांचे नियमिन करणाऱ्या स्वयत्त परिषदांची मान्यता आणि पदव्यांच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

नियमानुसार तंत्रज्ञान आणि व्यावसायिक विद्याशाखांचे अभ्यासक्रम हे ऑनलाईन किंवा दूरशिक्षण पद्धतीने चालवण्याची परवानगी नाही. दूरशिक्षणासाठीही देशातील मोजक्याच विद्यापीठांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सध्या देशभरात सुरू झालेली खासगी विद्यापीठे व्यावसायिक विद्याशाखांचे पदवी किंवा पदव्युत्तर अभ्याासक्रम दूरशिक्षण पद्धतीने सुरू केले आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने स्विकारले आहे. मात्र, त्यात नियमित अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ऑनलाइन माध्यमातून शिक्षण देणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठांनी ऑनलाइन, घरबसल्या पदवी देण्याची जाहिरातबाजी सुरू केली आहे. अशा स्वरूपातील पदवी देणाऱ्या अभ्यासक्रम संस्थांचे सध्या पेव फुटले आहे. काही संस्था परदेशी विद्यापीठांची पदवी देण्यात येणार असल्याचेही सांगत आहेत. मात्र, या पदव्यांच्या मान्यतेबाबत संभ्रम आहे.

दुकानदारी

कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन शासनाने या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले. अनेक संस्थांनी कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले. सध्या या संस्थाही नोकरीची हमी देत हे अभ्यासक्रम ऑनलाइन राबवत आहेत. बहुतेक अभ्यासक्रमांसाठी संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, त्याच्याही वैधतेबाबत प्रश्न आहेत.

काय काळजी घ्यावी

*   अभ्यासक्र म नियमित स्वरूपातील आणि की दूरशिक्षण याची प्रवेश घेण्यापूर्वी खात्री करावी

*    दूरशिक्षण अभ्यासक्र मासाठी दूरशिक्षण परिषदेची मान्यता आहे का हे पाहावे

*  तंत्रशिक्षण विषयातील अभ्यासक्र म दूरशिक्षण पद्धतीने राबवताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता असल्याची खातरजमा करावी

*  कौशल्य विकास अभ्यासक्र मांसाठी राष्टीय कौशल्य विकास मंडळाची (एनएसडीसी) मान्यता असल्याची खातरजमा करावी

‘व्यवस्थापन, पर्यटन, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विद्याशाखांचे दूरशिक्षण सुरू करण्यासाठी काही संस्थांनी परवानगी मागितली होती. त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बाकी अड्टयासक्रम दूरशिक्षण पद्धतीने चालवता येणार नाहीत.’

– डॉ अनील सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अ. भा. तंत्रशिक्षण परिषद