19 October 2020

News Flash

ऑनलाइन कंपन्यांना बेकायदा खाद्यपदार्थ पुरवणारे अडचणीत

मुंबईतील ११३ खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

कंपन्याही अडचणीत

११३ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटीस

मुंबई : ऑनलाइन अ‍ॅप किंवा संकेतस्थळांच्या माध्यमातून घरपोच खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या स्विगी, फुडपांडा, झोमॅटो, उबरइट या कंपन्या परवाना नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या संकेतस्थळांना खाद्यपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील ११३ खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

ऑनलाइन कंपन्यांना खाद्यपुरवठा करणारे विक्रते खाद्यपदार्थाची निर्मिती कशी करतात, त्यासाठी त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत का याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान केली. या काळात ३४७ विक्रेत्यांच्या दुकांनाची तपासणी केली. यापैकी ११३ खाद्यविक्रेते बेकायदा आणि अस्वच्छ वातावरणामध्ये खाद्यपदार्थनिर्मिती करीत असल्याचे आढळले. हे विक्रेते स्विगी, फुडपांडा, झोमॅटो, उबरइट या कंपन्यांना खाद्यपदार्थ पुरवीत होते. या विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा मानद कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांना दुकाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घेऊन त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनाही या प्रकरणात दोषी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

११३ खाद्यविक्रेत्यांमध्ये ८५ विक्रेते स्विगी, ५० विक्रेते झोमॅटो, ३ विक्रेते फुडपांडा आणि दोन विक्रेते उबरइटशी संलग्न असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:02 am

Web Title: online food delivery company get notice from food and drug administration
Next Stories
1 ‘सीएसएम’टी स्थानकात जखमी प्रवासी मदतीविना
2 आमदार रमेश कदम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास मान्यता
3 खर्च परवडत नाही! २०२३ पासून डबलडेकर पूर्णपणे बंद
Just Now!
X