तरुणाची ऑनलाइन फसवणूक

मुंबई : ऑनलाइन ऑर्डर करून बिअर पिण्याच्या इच्छेपायी वाळके श्वर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला सव्वा लाख रुपये गमावण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, याआधीही अशाच प्रकारे अन्य एकाची फसवणूक झाली होती.

वाळके श्वार परिसरात राहाणारा तरुण खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याला ४ जानेवारी रोजी बीअर पिण्याची इच्छा झाली. त्याने गूगल सर्च इंजिनद्वारे ‘लिव्हिंग लिक्विड्स’ दुकानाचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क साधून त्याने बीअरची ऑर्डर दिली. तरुणाला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीने बीअरचे पैसे आगाऊ ऑनलाइन पद्धतीने अदा करावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार तरुणाने गूगल पेद्वारे पैसे अदा के ले. त्यानंतर त्याच्याकडे आणखी २० रुपयांची मागणी करण्यात आली. ते न पटल्याने तरुणाने ऑर्डर रद्द करत पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीने बँक खात्यात पैसे जमा करू, असे सांगितले. त्यासाठी लघुसंदेशासोबत आलेला ओटीपी क्र मांक मागितला. तरुणाने ओटीपी क्र मांक देताच त्याच्या खात्यातून ६१ हजार रुपये वळते झाले. हा व्यवहार चुकू न घडला, असे सांगत तरुणाकडून पुन्हा एक ओटीपी क्रमांक घेण्यात आला आणि त्याच्या खात्यातून पुन्हा ६१ हजार रुपये परस्पर काढण्यात आले.

‘गुगल’च्या सुविधेचा गैरवापर

गूगलच्या ‘एडिट अ‍ॅण्ड सजेस्ट’ (संपादन व सूचना) या सुविधेचा वापर करत भामटे प्रसिद्ध सेवा पुरवठादार, कंपन्यांऐवजी स्वत:चा क्र मांक देतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित मद्यविक्री दुकानासमोरील संपर्क क्र मांक भामट्यांनी ‘एडिट अ‍ॅण्ड सजेस्ट’ पर्यायाचा वापर करत खोडला आणि तेथे स्वत:चा क्र मांक लिहिला. त्यामुळे तक्रारदार तरुणांचे दूरध्वनी दुकानात जाण्याऐवजी भामट्यांना आले.