05 December 2020

News Flash

तरुणीला तीन लाखांचा ऑनलाइन गंडा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रोर दिली.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : बँक खाते बंद होईल, अशी भीती घालून तरुणीला तीन लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ऑनलाइन भामटय़ांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काळबादेवी परिसरात राहाणाऱ्या तरुणीला मंगळवारी एका व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून बँक अधिकारी असल्याचे भासवले. के वायसी अद्ययावत न के ल्यास बचत खाते बंद के ले जाईल, असे या व्यक्तीने सांगितले. केवायसी अद्ययावत करण्याची प्रक्रि या म्हणून या व्यक्तीने तक्रोरदार तरुणीकडून काही तपशील आणि ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळवले. त्यानंतर १४ व्यवहार करून तीन लाख रुपये अन्य ठिकाणी वळवले. तरुणीने जाब विचारताच या व्यक्तीने मोबाइल बंद के ला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रोर दिली.

मोबाइल चोरांना चार तासांत अटक

मुंबई: मोबाइल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना  चार तासांतच अटक करण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले. २० ऑक्टोबरला रात्री ९.०२ वाजता  संतोष साळवे यांनी पनवेल लोकल पकडली. ती मशीद रोड स्थानकावरून सुटत असतानाच  डब्यात तीन तरुणांनी प्रवेश केला. सॅन्डहर्स्ट रोड स्थानक सोडताच तीनही जणांनी त्यांच्यासोबत झटापट केली आणि ७,६०० रुपयांचा मोबाइल चोरला. डॉकयार्ड रोड स्थानक येताच विरुद्ध दिशेला उतरून त्यांनी पलायन के ले. साळवे  स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी फलाट क्रमांक एकवर तीनपैकी एका आरोपीला पाहिले व त्याला पकडले. त्यानंतर या स्थानकातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला माहिती दिल्यानंतर अटक आरोपीकडून अन्य दोन जणांची माहिती घेतली व चार तासांत अटक के ल्याचे वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर.आर पाल यांनी सांगितले.

सराईत गुंड अटकेत

मुंबई : पूर्व उपनगरातील अरविंद सोढा या झोपडीदादाच्या संघटित टोळीतील गुंड आणि वाशी पोलीस एका गुन्ह्य़ात शोध असलेला आरोपी उमेश जवंजाळ यास मुंबई गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतून अटक के ली.  दोन वर्षांपूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला के ल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी मोक्कान्वये गुन्हा नोंदवला होता. त्या गुन्ह्य़ात जवंजाळचा शोध सुरू होता. मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक योगेश चव्हाण यांना जवंजाळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स परिसरात येणार, अशी माहिती मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 2:18 am

Web Title: online fraudster cheats woman of rs 3 lakh zws 70
Next Stories
1 शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का
2 ..तर नाटय़कर्मी आंदोलनाची तिसरी घंटा
3 टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट
Just Now!
X