28 February 2021

News Flash

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ऑनलाइन खरेदीला रंग

फोटोफ्रेम, कप अशा वस्तूंवर आवडत्या व्यक्तीचे नाव वा छायाचित्र छापून घेऊन त्या देण्याकडे कल आहे.

(संग्रहित छायाचित्र)

व्यक्तिगत वस्तू खरेदी करण्यावर तरुणाईचा भर

जगभरातील प्रेमीजनांचा उत्साह ज्या दिवशी भरभरून उतू जातो अशा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने भेटवस्तूंचा ऑनलाइन बाजार तेजीत आला आहे. देशीविदेशी ब्रॅण्डच्या वस्तूंबरोबरच आपल्या आवडत्या व्यक्तीच्या पसंतीनुसार व्यक्तिगत (पर्सन्लाइज्ड) भेटवस्तू देण्याकडे कल आहे. तसे पर्याय देशीच्या तुलनेत परदेशी ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याने त्याकडे खरेदीदारांचा ओढा आहे.

भेटवस्तूंना वाहिलेली भारतीय ई-कॉमर्स संकेतस्थळे तुलनेत कमी आहेत. त्यामुळे अनेक जण परदेशी संकेतस्थळांवरून भेटवस्तू मागवत असतात. ही संकेतस्थळे भेटवस्तूंबरोबरच लहानसहान दैनंदिन वापराच्या पण अत्याधुनिक वस्तूंकरिता प्रसिद्ध आहेत, अशी माहिती ‘ऑल गिफ्ट’च्या कार्यकारी व्यवस्थापक साहित्या नायर यांनी दिली. व्हॅलेंटाइन डेच्या काळात म्हणजेच फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर अशा परदेशी संकेतस्थळांवरून होणाऱ्या खरेदीत साधारण ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते, असे नायर यांनी सांगितले. भेटवस्तूंच्या अनंत पर्यायांबरोबरच त्या हव्या त्या ठिकाणी पोहोचविल्या जातात. फक्त पूर्वनोंदणी करावी लागते. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही स्वीकारला जात आहे, असे ‘पर्ल गिफ्ट बाय मोनिका’च्या मोनिक चोप्रा यांनी सांगितले.

भेटवस्तूंना भावनिक स्पर्श

फोटोफ्रेम, कप अशा वस्तूंवर आवडत्या व्यक्तीचे नाव वा छायाचित्र छापून घेऊन त्या देण्याकडे कल आहे. टेडीबेअर, फुले, चॉकलेट, दागिने, कपडे, शोभेच्या वस्तूंनाही ‘व्यक्तिगत स्पर्श’ देता येऊ लागला आहे. फिरते रुबिक, लॅम्प, पझल्स, पेन ड्राइव्ह, दिव्यांच्या माळा, फोटो बुथ, कार्डबोर्ड फोटो स्टोरी क्युबिक, डिजिटल फोटो फ्रे म, उशी, मोबाइल अशा भेटवस्तूंचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. मोबाइल कव्हर, पाण्याची बाटली, काचेचे लॅम्प, वॉलेट वरही नाव वा चित्र छापून मिळते.

गेल्या दोन वर्षांत भारतामध्ये क्लब फॅक्ट्री, ब्रँड फॅक्टरी, गिफ्ट कार्ट, कस्टमाइज्ड इत्यादी अनेक भेटवस्तूंची परदेशी ई-कॉमर्स संकेतस्थळे आली आहेत. भारतातील मोठा ग्राहकवर्ग हेरून या कंपन्या इथे येत आहेत. ग्राहकांना १० ते ४५ टक्के सवलती देऊन ते त्यांना आकर्षितही करत आहेत.

– आदित्य पाटील, डिजिटल माध्यम व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 12:36 am

Web Title: online shopping on the occasion of valentines day
Next Stories
1 कामगार संघटनांमध्ये शीतयुद्ध
2 घरात मस्ती करते म्हणून जन्मदात्या आईनेच दिले ५ वर्षाच्या मुलीला मेणबत्तीचे चटके
3 तारापोरवाला मत्स्यालयात आता ऑक्टोपस, स्टिंग रे, पाणसर्पही
Just Now!
X