26 November 2020

News Flash

प्रवेश होईपर्यंत अकरावीसाठी ऑनलाइन अभ्यास

अद्याप प्रवेश प्रक्रियेबाबतचे चित्र स्पष्ट नाही

(संग्रहित छायाचित्र)

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची संदिग्धता अद्यापही कायम असल्यामुळे आता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती देतानाच यंदा प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यावेळी अकरावी प्रवेशाची पहिली फेरी झाली होती. मात्र, दुसऱ्या फेरीपूर्वी विभागाने प्रवेश प्रक्रिया थांबवली. प्रक्रिया कधी सुरू होणार, पहिल्या फेरीत मिळालेले प्रवेश कायम राहणार का, असे प्रश्न उपस्थित झाले. प्रवेश प्रक्रिया स्थगित होऊन जवळपास महिना झाला तरीही अद्याप प्रवेश प्रक्रियेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. याबाबत कधी निर्णय होणार हे देखील अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे  सद्य:स्थितीत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.

विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत. विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येईल. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक शाखांचा अभ्यास करता येऊ शकेल. जेणेकरून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी कोणते विषय आवडतात यानुसार विद्यार्थ्यांना निर्णय घेणेही सोपे होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:19 am

Web Title: online study for eleven until admission abn 97
Next Stories
1 पोलिसांची खाती एचडीएफसी बँकेत
2 ‘रेमडेसिवीर’ करोना उपचारात उपयुक्त
3 ‘टीआरपी’ वाढताच जाहिरातींचा ओघ
Just Now!
X