मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असली तरी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये इमारतीतील रुग्णांचे प्रमाण जास्त असून झोपडपट्टय़ा व चाळीतील रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुंबईत सध्या प्रतिबंधित इमारतीच्या तुलनेत प्रतिबंधित झोपडपट्टय़ांचे प्रमाण खूपच कमी आहे. १ मार्चच्या आकडेवारीनुसार १३७ इमारती प्रतिबंधित आहेत. तर के वळ १० झोपडपट्टय़ा प्रतिबंधित आहेत.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील रुग्णांची संख्या वाढू लागली. मात्र या रुग्णांमध्ये इमारतीतील रुग्णांची संख्या अधिक आहे. झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आपोआपच कमी झाली आहे. झोपडपट्टय़ा किं वा बैठय़ा चाळी या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात लोकसंख्या अधिक असते. मात्र तेच इमारतीत लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे तिथे प्रतिबंधित भागात राहणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. प्रथमच प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्याही इमारतीतील रहिवाशांच्या तुलनेत घटली आहे.

एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्याचे नवे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १८ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार आता इमारती प्रतिबंधित के ल्या जात आहेत. सध्या अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक म्हणजेच १९ प्रतिबंधित इमारती आहेत. त्याखालोखाल चेंबूरमध्ये १८, भांडुपमध्ये १६, वांद्रे पश्चिममध्ये १२, लालबाग परळमध्ये १२ इमारती प्रतिबंधित आहेत. तर मुंबईत बहुतांशी भागात एकही प्रतिबंधित क्षेत्र नसताना के वळ भांडुपमध्येच ६ क्षेत्रे प्रतिबंधित आहेत. त्याखालोखाल कु र्लामध्ये २, वांद्रेमध्ये १ व लालबाग परळमध्ये १ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

१८६३ ठिकाणी मजले प्रतिबंधित

पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले तर त्या इमारतीचा विशिष्ट मजला प्रतिबंधित के ला जात आहे. मात्र प्रतिबंधित इमारतींची संख्या दाखवण्यासाठी पालिके तर्फे  जी विशिष्ट संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) वापरली जात होती. त्यात प्रतिबंधित मजल्यांची संख्या दाखवण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रतिबंधित इमारतींची संख्या वाढत जात होती. विभाग कार्यालयांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर पालिके ने आता प्रतिबंधित मजल्यांची वेगळी यादी देण्यास सुरुवात के ली आहे. त्यानुसार मुंबईत १८६३ ठिकाणी मजले प्रतिबंधित आहेत. त्यात सर्वाधिक संख्या अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ग्रॅण्ट रोड, मालाड, मुलुंड, चेंबूर, गोरेगाव, कांदिवली या भागांत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

* प्रतिबंधित क्षेत्र -१०

* एकू ण लोकसंख्या -६१ हजार

* प्रतिबंधित इमारती -१३७

* एकूण लोकसंख्या – १ लाख २७ हजार

* प्रतिबंधित मजले  – १८६३

* एकूण लोकसंख्या – ३.८२ लाख