राज्यातील जलाशयांमध्ये फक्त १५ टक्के साठा शिल्लक राहिला असून, आठवडाभरात एक टक्का साठा कमी झाल्याने सरकारमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखी पाणी कपातीशिवाय पर्याय नाही, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. मराठवाडय़ातील जलाशयांमध्ये तर केवळ दोन टक्के साठा शिल्लक असून येत्या पंधरा दिवसांत मराठवाडा कोरडाठाक होईल, अशी चिन्हे आहेत.

आठवडाभरात सरासरी एक टक्का पाण्याचा साठा कमी होतो. अजून महिना ते दीड महिना या साठय़ावर काढायचा असल्याने सरकारच्या पातळीवर तोडगा कसा काढता येईल याचा आढावा घेण्यात येत आहे.

मोठय़ा धरणांमधील पाण्याचा साठा : भातसा (३७ टक्के), मध्य वैतरणा (४४ टक्के), जायकवाडी (शून्य टक्के), भीमा उजनी (शून्य टक्के), कोयना (१९ टक्के), वारणा (१५ टक्के), दुधगंगा (सात टक्के), राधानगरी (१२ टक्के).

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा :  मोडक सागर (१२ टक्के), तानसा (३० टक्के), विहार (१८ टक्के), तुळशी (३८ टक्के). ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात २४ टक्के साठा आहे.