27 May 2020

News Flash

शिधावाटप दुकानांमध्ये ३० टक्केच धान्यसाठा

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

(संग्रहित छायाचित्र)

गरीब व मध्यमवर्गीयांना मुबलक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी सध्या दुकानांमध्ये सुमारे ३० टक्केच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अन्नधान्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती भाजप आमदार अ‍ॅड. पराग अळवणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

केंद्र सरकारने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य एकाच वेळी खरेदी करण्याची मुभा दिली आहे. त्याव्यतिरिक्त पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो डाळ शिधापत्रिकाधारकांना मोफत दिली जाणार आहे. पण याबाबतचे आदेश शिधावाटप दुकानांमध्ये पोचलेले नाहीत आणि अन्नधान्याचा ३० टक्केच साठा उपलब्ध असल्याचे विलेपार्ले परिसरातील दुकानदारांनी सांगितले.

अन्नधान्य उपलब्ध होण्यास १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हापुन्हा दुकानांमध्ये येऊन रांगा लावाव्या लागतील. त्यांना आपण घरात राहून सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना केली असून हेलपाटे मारायला लागू नयेत, असे अळवणी यांनी पत्रात म्हटले आहे. ॉ

दरम्यान, शिधावाटप दुकानांमधून अन्नधान्य मिळण्यासाठी शासनाने कोणतेही पाऊल उचलेले नाही. स्प्रसारित होत असलेला अर्ज बनावट असून नागरिकांनी आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:59 am

Web Title: only 30 of the grain is available in the shops abn 97
Next Stories
1 अंगणवाडीतील ७३ लाख बालके उपाशी!
2 ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज
3 सक्तीच्या सुट्टीत प्रेक्षकांना मोफत वाहिन्या
Just Now!
X